रायगड जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय टळणार

- तीनशे खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीचे भूमिपूजन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ३०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. या कामाला रायगडचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत हे असताना मंजुरी मिळाली होती. यामुळे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले.
या इमारतीच्या बांधकामास जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत हे असताना मंजुरी दिली होती. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी कार्यकाळात यश मिळाले. या नव्या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांची अन्यत्र जाण्याची धावपळ थांबणार असून आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कायम अग्रेसर राहील, अशी शाश्वती राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी दिली.