राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल-रायगडच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : पनवेल शहर किक बॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने वाको इंडिया सीनियर नेशनल किक बॉक्सिंग चँपियनशिप २०२४, इनडोअर स्टेडिअम, म्हापसा, गोवा येथील स्पर्धेत वाको महाराष्ट्र कोच व मुख्य प्रशिक्षक नीलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किकलाईट -७४ किलोवजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.
या अनुज भोसले यांनी किकलाईट -८९ किलोवजनी गटात रौप्यपदक व लाइट काँटॅक्ट -८९ किलोवजनी गटात कांस्यपदक, चिराग शिवगण याने किकलाईट +९४ किलो प्रकारात रौप्यपदक, आर्यन शिवतरकर किकलाईट -९४किलो प्रकारात कांस्यपदक, फाल्गुनी दकोलीयाने लो-किक -४८किलो प्रकारात
रौप्यपदक पटकाविले.
याचबरोबर हर्षदा मोकल हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या सर्व खेळाडूंचे वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलास व पनवेल शहर किक बॉक्सिंग असोसिएशन सचिव मंदार पनवेलकर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.