साडेसहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुजरातमध्ये अटक
खेड : खेडमध्ये गुन्हा करून नंतर पोलिसांना तब्बल साडेसहा वर्षे गुंगारा देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरातमधून शनिवारी ताब्यात घेतले आहे. वसीम इम्तियाज शेख (रा.कोकंबा आळी, दापोली ) असे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सहा वर्ष 5 महिने गायब झाला होता. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्याने एस पी धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाला वसीम शेख बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी गुजरातमधील सुरत शहरानजिकच्या उधना यार्डमधून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी खेड पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर यांनी केली.