८ मार्चपर्यंत कर्णबधिरता सप्ताहाचे आयोजन
अलिबाग : दि.03 मार्च या जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग तसेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दि.1 मार्च ते दि.8 मार्च 2023 या कालावधीमध्ये कर्णबधिरता निवारणाविषयी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये कानाविषयी विविध तपासण्या तज्ञांमार्फत करण्यात येत आहेत. तसेच कर्णबधिरतेविषयी जनजागृती होण्यासाठी अलिबाग शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी तसेच पोस्टर्स व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सप्ताहामध्ये कानाची तपासणी, कर्णबधिरते विषयी दिव्यांग प्रमाणपत्र वाटप देखील करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील ओपीडी क्रमांक 24 मध्ये संपर्क साधून या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई तसेच अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.