महाराष्ट्र
अंबरीन मुक्री व सीमा घरत यांच्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा सत्कार
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : अंबरीन एम इस्माइल मुक्री- महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्टरी (मायनॉरिटी) काँग्रेस. तथा समाजसेविका व सीमा घरत उरण तालुका अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील) यांची भेट घेउन महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत चर्चा केली.
यावेळी नव्यानेच पदभार स्विकारल्याने राजेंद्र पाटील यांचा अंबरीन मुक्री आणि सीमा घरत यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.