अटल सेतूवर महिलेचा आत्महत्तेचा प्रयत्न ; पोलिसांनी वाचवले प्राण!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबईतील अटल सेतूवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
दिनांक 16/8/2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवर अटल सेतूवर मुंबईकडून शेलघर टोल नाक्याकडे जाणाऱ्या लेन 12.4 अंतरावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 02 FH 1686 ही रस्त्यात थांबली असून कारमधील एक महिला ब्रिजचे रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत आहे, अशी माहिती न्हावा शेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंगच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच पेट्रोलिंग 1 वाहनावर वर असलेले 1)पोलीस नाईक 3018 ललित शिरसाठ 2) पोलीस नाईक 2322 किरण मात्रे 3) पोलीस शिपाई 4341 यश सोनवणे हे सदर ठिकाणी पोहोचताच रिमा मुकेश पटेल (56 वर्ष गृहिणी राहणार मुलुंड मुंबई) यांनी ब्रिजवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता सदर पेट्रोलिंगवर कार्यरत असलेले पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढले.
या घटने दरम्यान सर्वप्रथम एका कार ड्रायवरने तिला आत्महत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही ती महिला ऐकत नव्हती. मात्र वेळेत वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दाखल झाल्याने या महिलेला पोलिसांनी पुलावरून बाहेर ओढून सुरक्षित स्थळी आणले. व तिचे प्राण वाचवले.
ड्रायवर संजय द्वारका यादव (वय 31 वर्षे धंदा टॅक्सी चालक राहणार कोपरी, हेमलता यांची चाळ ठाणे) या व्यक्तीने सर्वप्रथम त्या महिलेला समुद्रात उडी मारू नये म्हणून पकडून ठेवले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व महिलेचा जीव वाचवला.
ही महिला अगोदर ऐरोली येथे समुद्रात देवाचे फोटो टाकण्यासाठी गेली होती. मात्र तिथे पाणी कमी होते. तिला कोणीतरी सांगितले होते की देवाचे फोटो खोल पाण्यात विसर्जन करावे. त्या अनुषंगाने ती खोल पाण्याचा शोध घेत अटल सेतूवर आली. ती महिला धार्मिक वृत्तीची असून ती गोंधळलेल्या स्थितीत होती. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तिला वाचविण्यात यश आले असून ती महिला फोटो टाकण्यासाठी आली होती की, आत्महत्त्या करण्यासाठी आली होती याचा अधिक तपास न्हावा शेवा पोलीस स्टेशन करीत आहे.
–अंजुमन बागवान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा.