ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने उरण हादरले

उरण, दि २० (विठ्ठल ममताबादे ) :
यशश्री शिंदे हिच्या संदर्भातील घटनेनंतर उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न. 5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ३ वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून ही घटना उरण मोरा येथील फड न.5 मोहन स्टोर, सिंडीकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे.

या कामी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे. माझे पती, दोन मुलगे अनुक्रमे 10 व 9 वर्षाची दोन मुले 3 वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो. 13 जानेवारीस मी मुलीला शेजारच्या अंगणवाडीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता न तिला घरी आणली असल्याचे तिने आपल्या फिर्यादीमध्ये नोदविले आहे.

त्यानंतर आई घरातील आई कपडे धुण्यासाठी घरात गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्या करिता रडू लागली ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला अडथळा लाऊन अडकून ठेवले मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर(50)हा तेथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले. काही वेळाने आई काम आटोपून आली अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याला मुलीसंदर्भात विचारण केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्याने सांगितले आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी शौचालयाच्या दरवाजाजवळ असल्याचे तो म्हणाला.

आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले. तिला ताप भरला म्हणून उरणमधील अभिनव चाईल्ड केअर क्लिनिकमध्ये नेले असता तेथी डॉ. अजय कोळी यानी तापावरऔषध देऊन घरी जाण्यास सांगितले परंतु तीन दिवसा नंतरही ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचे सांगितले, त्यामुळे मुलीला उरणमघील गाडे हॉस्पिटल मघे नेले असता डॉ.प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले. त्यानंतर आईच्या पाया खालची वाळू सरकली तिने थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून या बाबत दिनेश निवेतकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली. या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

या प्रकरणी अनुषगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता2023 कलाम 62(2),बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-4 बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-6 प्रमाणे गुंन्हादाखल करण्यात अला आहे.

या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button