आक्रमक ग्रामस्थांनी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला धाडले परत
जुन्या भू भाडेधारकांचे पुनर्वसन ही सिडकोची जबाबदारी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : अनधिकृत बांधकाम विभाग सिडको यांनी दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी अनधिकृत बांधकाम धारक /भाडेकरू/वखार धारक यांच्या वर एम आर टी पी कायद्या अंतर्गत नोटीसा पाठविल्या होत्या. त्या निमित्ताने जेएनपीटीसमोरील अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
उरण तालुक्यातील काळाधोंडा येथील सर्व्हे नंबर ४ हिस्सा नंबर २ येथील मयतासाठी लागणाऱ्या लाकडाच्या वखारीला सिडकोने ५३(१) (ब) खाली नोटीस बजावुन कारवाई करण्यासाठी आले होते. प्रत्यक्ष वखारीचे पुरावे नष्ट करण्यासाठी आले होते .सिडको अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांना या नोटीस संबंधी वखार धारक,शेतकरी कोटनाका ग्रामस्थ,चारफाटा ग्रामस्थ कोळी संघटना, ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी जोरदार विरोध केला.नोटीस वरती वखार धारकाचे नाव नाही. नोटीस वरती दिनांक नाही. रितसर चाळीस पंचेचाळीस वर्षे नियमित चाणजे ग्रामपंचायतीमध्ये सदर ठिकाणी राहणारे नागरिक कर भरतात त्याची सर्व कागद पत्रे नागरिकांकडे होती तरी त्या ठिकाणी सिडकोचे अतिक्रमण पथक कारवाई करायला आले होते.काळाधोंडा या ठिकाणी जुनी वखार आहे त्या ठिकाणी सिडकोचे अतिक्रमण पथक आले तेंव्हा सर्वांनीच जोरदार प्रतिकार केला. तेव्हा सिडको पथकाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे म्हणाले उरण बायपास रस्त्याते कामात अडथळा आणू नका. तेव्हा सर्व प्रकल्प बाधीत आंदोलक म्हणाले की, उरण बायपास रस्ता प्रत्यक्ष काळाधोंड सव्हे नंबर ८ हिस्सा नंबर १ मधे आहे. आमचा सव्हे नंबर ४ हिस्सा नंबर २ आहे. आमचे पुनर्वसन करा, पर्यायी जागा द्या, पुनर्वसन कायदा २०१३ व संविधान आरटीओ २१ प्रमाणे आम्हाला न्यायालयात जाण्यासाठी पुरेपूर संधी देऊन मुदत द्या. नाताळच्या सुट्टीमुळे कोर्ट बंद आहेत तरी आम्हाला कायदेशीर मार्गाने न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी. २४ तासाच्या आत मध्ये तोडक कारवाई थांबवावी नाहीतर आम्ही सर्व आमच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरून सिडको विरुद्ध लढा देऊ. यामुळे सिडको अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांनी मुदत वाढवून दिली आणि कारवाई थांबवली.
सिडको क्षेत्रातील गावाकऱ्यांनी नवी मुंबई शहरासाठी आपल्या पिकत्या शेत जमिनी दिल्या आहेत. आता त्याची विस्तारतीत गावठाण जमीन मालकी हक्काने देणे हे शासनाचे कर्तव्य ठरते. परंतु गावठाण विस्ताराची जबाबदारी सिडको, जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, महानगर पालिका प्रशासनाची आहे. चुकीच्या भू संपादन मुळे लोकांच्या राहत्या घरांवर सिडको मार्फत हातोडा पडत आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त,शेतकरी, भाडेकरू आणि स्थानिक यांनी आपल्या न्याय हका साठी रस्त्यावर उतरावे आणि आपल्याला अतिक्रमणे च्या नावाखाली सिडको तोडक कारवाई करते त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी असे आवाहन ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी यावेळी केले.
लढाईत राजाराम पाटील, किसन तांडेल, कोटगाव ग्रामस्थ, कृष्णा जोशी, शिवाजी ठाकुर, शेतकरी जयवंत पाटील, दिलीप कोळी, विश्वनाथ पाटील, मनोज भोईर, चव्हाण कुणाल गायकवाड, जहीद मुल्ला, विकास पाटील,विश्वास पाटील, उमेश पाटील, विजय पाटील, नरेंद्र पाटील विनोद पाटील, वर्षा तांडेल, सुष्मा गायकवाड, केसरी पाटील, नितीन पाटील, कोटकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.