ब्रेकिंग न्यूजरत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
ओणी-पाचल मार्गावर एसटी बस-टेम्पोच्या अपघातात चालकासह चौघे जखमी
ओणी-पाचल मार्गावर एसटी बस-टेम्पो अपघातात पाचजण जखमी

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी- पाचल मार्गावर पाचल येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणार्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस तसेच दुध वाहतूक करणाराvटेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एसटी वाहकासह एक विद्यार्थी व टेम्पो चालक व क्लिनर असे चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या दरम्यान सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर हा अपघात झाला.
या ठिकाणी चढावाला असलेल्या एस. टी. बसला समोरून भरधाव वेगात येणार्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघाता नंतर हा आयशर टेम्पोही रस्त्याच्या बाजुला कोसळला. तर एसटी बसही रस्त्याच्या बाजुला कलंटली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.