आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११वीतील विविध वर्गात गुणानुक्रमे प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातील सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे:-
११वी कला: गौरी सागवेकर, श्रुती सागवेकर, सुचिता गित्ते.
११वी वाणिज्य: निधीता वेलवणकर, आर्या राजवाडे, साक्षी चाळके.
११वी संयुक्त (कला व वाणिज्य): गायत्री रामाणे, साहिल पाकतेकर, प्रीती माईन.
११वी वाणिज्य-ब: करिष्मा गुरव, अनेश झेपले, श्रावणी शिवगण.
११वी बँकिंग व ऑफिस मॅनेजमेंट: मयुरी साळवी, धनश्री जुवळे, विभागून समृद्धी नार्वेकर आणि ऐश्वर्या गुरव.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी सर्व वर्गाचे निकाल १००% लागल्याबद्दल विद्यार्थी व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या संधी व महाविद्यालयातून उपलब्ध होणारे शिक्षण याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. आधुनिक युगातील वाढलेली स्पर्धा यासाठी विद्यार्थ्यांनी करियर निवडताना कोणती काळजी घ्यावी याबाबत विवेचन केले. कनिष्ठ महाविद्यालय व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना महाविद्यालय व संस्थेच्यावतीने उपलब्ध होणाऱ्या विविध सोयी सुविधा आणि संधी यांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी वेळोवेळी महाविद्यालयात जी प्रशिक्षणे व कार्यशाळा आयोजित केली जातात त्यांचा विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरच्या दृष्टीने विचार करावा असे आवाहन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. सीमा शेट्ये यांनी मानले.
गुणानुक्रमे अव्वल ठरलेल्या व यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, न शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, अक्षय भुवड, सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.