आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्गातील स्मारकाचे लोकार्पण
सिंधुदुर्ग नगरी : मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्यानंतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं भव्य स्मारक ओरोस येथे उभारण्यात आलं आहे. यास मार्गाचा लोकार्पण दिनांक 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
बाळशास्त्री यांची २११ वी जयंती दि. २० फेब्रुवारी होती याचे उचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी १८१२ ला तर मृत्यू १७ मे 1846) झाला. आहे.. मराठी पत्रकार परिषद तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लागला आहे. स्मारकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एका पत्रकारांचं महाराष्ट्रातलं हे पहिलं स्मारक. त्याचा आनंद तमाम मराठी पत्रकारांना आहे.
लोकार्पणानिमित्त स्मारकाच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.