महाराष्ट्रस्पोर्ट्स
उद्योजक प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उदघाटन
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : स्वप्निल स्पोर्टस कंठवळी मर्यादित क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम क्षेत्रातील उद्योजक उद्योजक प्रविण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दर्शन ठाकुर (उद्योगपती), गोपीनाथ पाटील (गाव अध्यक्ष), माधव पाटील, वसंत पाटील,दिपक पाटील, विशाल पाटील, वैभव पाटील, साईनाथ पाटील, माजी जिल्हा जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
लहान बालके व तरुणांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळाला तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष तथा उद्योगपती प्रवीण ठाकूर हे प्रयत्नशील असून त्यांनी या क्रिकेट सामन्याचे मोठया उत्साहात उदघाटन केले आहे.