महाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

उरणमध्ये एनएमएमटी बससेवा सुरु करण्याची मंगेश तांडेल यांची मागणी

  • रेल्वे सेवेच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना फटका

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : अनेक वर्षांपासून उरण तालुक्यात सुरु असलेली एनएमएमटी बससेवा दि. २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानक बंद करण्यात आली आहे. ही बससेवा तत्काळ सुरु करण्याची मागणी उरण तालुक्यातील सोनारी गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी प्रशासनाकडे केली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने उरण ते नवी मुंबई मार्गावर बस सेवा सुरु होती.

जुईनगर ते उरण शहरासह तालुक्यातील कोप्रोली, वशेणी व पिरकोन या मार्गांवर चालणाऱ्या ३०, ३१ व ३४ क्रमांक असलेल्या एनएमएमटी बस दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यवसाय, नोकरी, धंदा, कार्यालयीन व दैनंदिन कामासाठी मुंबई,ठाणे, नवीमुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.त्याच प्रमाणे आर्थिक नुकसान देखील होत आहे. याशिवाय दहावी, बारावी तसेच विविध कोर्स तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी उरण तालुक्यातील विद्यार्थी मुंबई, नवी मुंबई मध्ये शिकण्यासाठी मोठया प्रमाणात जात असतात.

या सर्वांसाठी एनएनएमटी बसने प्रवास करणे सुरक्षित एकमेव व उत्तम पर्याय होते. मात्र एनएमएमटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.उरण मध्ये रेल्वे सेवा सुरु झाली आहे मात्र रेल्वेच्या फेऱ्या नवी मुंबई साठी एक – एक तासाने आहेत. रेल्वे सेवेच्या नवी मुंबईत जाण्यासाठी व नवी मुंबई मधून परत उरण मध्ये येण्यासाठी फेऱ्या कमी असल्यामुळे व वेळेत रेल्वे सेवा नसल्याने रेल्वे सेवेचा प्रवाशांना योग्य तो फायदा होत नाही.रात्री १० नंतर रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकत नाही आणि रेल्वे रात्री मिळाली नाही तर विद्यार्थी व प्रवाशांना नवी मुंबई मध्ये रात्री अडकून राहावे लागते. रेल्वे सेवेचा विद्यार्थ्यांना कोणताच फायदा नाही.त्यामुळे उरण तालुक्यात एनएमएमटी तत्काळ सुरु करण्याची मागणी सोनारी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी केली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button