उरणमध्ये ‘ए ट्रीब्युट वूमेन्स इरा’ महोत्सव’
उरण ( विठ्ठल ममताबादे) : सालाबादप्रमाणे यंदाही 13 जानेवारी 2023 रोजी एस एस . पी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन झाला.आज समाजात स्त्री पुरुष हे दोघेही समान आहेत. स्त्री पुरुष यात कोणताही भेद नाही.हाच संदेश समाजात देण्यासाठी ए ट्रीब्युट वूमेन्स इरा महोत्सवचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भारतातील विविध स्त्री सामाजिक कार्यकर्त्या, स्वातंत्र्य चळवळीतील महिला स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या कर्तबगार महिला यांच्या जीवन व कार्यावर आधारित नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.आपल्या नृत्यातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.या सोहळ्यात मिसेस टूरिझम ग्लोब 2022 (थायलंड) अवार्ड प्राप्त हर्षला तांबोळी, निर्देशक आणि लेखक फिरोज कुरेशी, एस एस पी इंटरनॅशनल शाळेचे सल्लागार स्वाती म्हात्रे या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. विदयार्थ्यांनी यावेळी वेगवेगळे नृत्य अविष्कार करून रसिक प्रेषकांची मने जिंकली. नृत्य शिक्षिका नम्रता ठाकूर, शाळेचे संगीत शिक्षक रुपेश विश्वकर्मा यांचे विद्यार्थ्याना उत्तम मार्गदर्शन प्राप्त झाले.
वार्षिक महोत्सव अविस्मरणीय बनविण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद , शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला थोडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सेक्टर 15, द्रोणागिरी नोड, उरण येथे एस एस पी इंटरनॅशनल शाळा कार्यरत असून विविध सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आदी उपक्रम एस एस पी इंटरनॅशनल शाळेमार्फत राबविले जातात.शाळेच्या सर्वच उपक्रमांना विद्यार्थी, पालकांचा नेहमी उत्तम प्रतिसाद मिळत असतो.