उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन
उरण दि. ९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण पंचायत समिती, शिक्षण विभाग व रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, उरण, जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यामाने ५१ वा ‘उरण तालुका विज्ञान प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून आमदार महेश बालदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास महाजन अध्यक्ष-रोटरी एज्युकेशन सोसायटी, श्रीमती प्रियांका म्हात्रे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उरण यांनी महेश बालदी आमदार उरण विधानसभा यांचे पुष्पगुच्छ, शॉल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व रोटरी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांचे स्वागत व सत्कार गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रियांका म्हात्रे यांनी केले. प्रमुख मान्यवर समीर वठारकर- गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांचे स्वागत व सत्कार विकास महाजन यांनी केले. नायब तहसिलदार धुमाळे यांचे श्रीमती प्रियांका म्हात्रे यांनी स्वागत व सत्कार केले. डॉ. सोमनाथ भोजने, पशु वैद्यकीय अधिकारी यांचे श्रीमती प्रियांका म्हात्रे यांनी स्वागत व सत्कार केले. तसेच जगदीश पाटील रोटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. बी.व्ही.देवणीकार, विश्वस्त यांचे स्वागत व सत्कार केंद्र प्रमुख टि. जी. म्हात्रे यांनी केले. नरेंद्र पडते यांचे स्वागत व सत्कार श्रीमती. पुष्पा कुरूप यांनी केले. गटशिक्षणाधिकारी श्रीमती. प्रियांका म्हात्रे यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष विकास महाजन यांनी केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक व कर्मचारी वर्गाचे हार्दिक स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश बालदी आमदार उरण विधानसभा यांनी सुंदर भाषण केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी आपला देश विज्ञान मध्ये कसा पुढे जात आहे व प्रगती करत आहे त्याचे उत्तम उदहारण दिले.यावेळी विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाला विकास महाजन – अध्यक्ष, यतिन म्हात्रे – सचिव, शेखर म्हात्रे-सह सचिव, प्रसन्नाकुमार – खजिनदार, रोटरी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. विज्ञान प्रदर्शना मध्ये उरण तालुक्या मध्ये प्रकल्प (गट – ६ वी ते ८ वी) प्रथम क्रमांक त्रिशा किरण म्हात्रे, परशुराम धाकु खारपाटिल विद्यालय, चिरनेर व प्रकल्प (गट – ९ वी ते १२ वी) प्रथम क्रमांक कु.सार्थक रवींद्र शेलार, यू ई एस स्कुल उरण या शाळेंना घोषित करण्यात आले व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व त्यांचे अभिनंदन करण्यात आले. इतर स्पर्धाचे सुध्दा पारितोषिक प्रमुख अतिथी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी विकास महाजन, यतिन म्हात्रे व पंचयात समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती. प्रियांका म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणा मध्ये सर्व विजेता स्पर्धाकांचे अभिनंदन केले. कौतुक केले व सदर कार्यक्रम यश्स्वी झाल्या बदल पंचायत समिती आणि रोटरी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे आभार मानले. या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.