महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण
उरण वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये वाहतुकीचे नियमांचे प्रबोधन

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : ९ डिसेंबर २०२५ रोजी तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक विद्यालय, फुंडे, उरण येथे वार्षिक क्रीडा महोत्सव २०२५ उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत विशेष प्रबोधन करण्यात आले.
या वेळी वाहतूक संबंधि प्रबोधन करण्यात आले. अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही वाहन चालवू नये,अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लर्निंग लायसनमध्ये कोणीही डबल सीट वाहन चालवणार नाही;चालवल्यास पक्का लायसनधारक पाठीमागे बसलेला असावा,आपण किंवा आपले आई‑वडील वाहन चालवीत असताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे,फोरविलर असल्यास सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे,सिग्नल जंप करू नये,ट्रिपल सीटवर कोणीही जाणार नाही,रॉंग साईडने वाहन चालवणार नाही आदी नियम संदर्भात जनजागृती करण्यात आली.
दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० ते १० च्या सकाळच्या वेळेस हा कार्यक्रम घेण्यात आला होता. तर या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील २०० ते ३००विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गलांडे यांनी केले. साळुंखे सर, प्राध्यापक पाटोळे सर, चेअरमन कृष्णाजी कडू, आमोद ठक्कर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.




