महाराष्ट्रराष्ट्रीयशिक्षण
‘एनसीसी’मधील सहभागामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमधील आत्मविश्वास वाढतो व नेतृत्व गुणांचा विकास होतो, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणे आवश्यक आहे, असे देखील राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या चर्चासत्रात त्यांना मार्गदर्शन करताना केले.