मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचे खेकडा संवर्धन केंद्र, गोवा येथे कार्यानुभव प्रशिक्षण

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिरगांव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र सहा मधील ३ विद्यार्थ्यांसाठी Aquaculture Engineering या विषयाअंतर्गत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. राजेश ठोकळ सर यांची परवानगी व मार्गदर्शनाखाली कार्यानुभव कालावधीमध्ये श्री. संपद देसाई यांच्या मालकीच्या नामांकित रिगल पेस्काटेक प्रायव्हेट लिमिटेड या खेकडा संवर्धन केंद्र, गोवा येथे सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रशिक्षणाअंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी खेकडा संवर्धनाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञानासाठी लागणारी यंत्रसामग्री, फिल्ट्रेशन यंत्रणा आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग यांचा सखोल अभ्यास केला. प्रशिक्षणामध्ये विपुल मोहिते, कुणाल बिडू व प्रसाद जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मत्स्य अभियांत्रिकी पदविकाचे माजी विद्यार्थी आणि रिगल पेस्काटेक कंपनीचे मॅनेजर श्री. शुभम पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी रिगल पेस्काटेक कंपनी यांच्या अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

