ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
सावधान !! पुढील तीन-चार तासात जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस

रत्नागिरी : पुढील ३-४ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री तसेच शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागाला पावसाने दणका दिला. यामध्ये विशेषता रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरासह राजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊल झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या उत्तर भागात मात्र पावसाचा तितकासा जोर नव्हता. मात्र शनिवारी रात्री हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार पुढील तीन-चार तासात विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.