कल्याण-सावंतवाडी एक्सप्रेससाठी माजी आमदार नरेंद्र पवार सरसावले!

- चाकरमान्यांसाठी आता कल्याण पूर्व माजी आमदार नरेंद्र पवार यांचा पुढाकार
ठाणे : भारतीय जनता पक्षाचे कल्याण पूर्व मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण – सावंतवाडी “दैनिक एक्स्प्रेस” सुरु करण्यासाठी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या गरीब रथ (12202) व हजरत निजाम उद्दीन (12432) या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी जो पुढाकार घेतला आहे.
या संदर्भात माजी आमदार पवार यांनी दि १६ जून २०२५ रोजी ल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे ही मागणी करून यासाठीचा पाठपुरा अद्यापही सुरूच ठेवला आहे कोकणात जाणारी अशी गाडी सुरू झाली तरही बाब कल्याण आणि कोकणातून प्रवास करणाऱ्या जनतेसाठी महत्त्वाची आहे. कोकणातील चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यासाठी, विशेषतः सणासुदीच्या काळात, या ट्रेनचे थांबे अतिशय उपयुक्त ठरतील.
माहिती अधिकार महासंघ, महाराष्ट्र राज्य व कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद श्री. नरेंद्र पवार यांनी दिला आहे.