महाराष्ट्र
काँग्रेसचे प्रदेश शिक्षण सेल अध्यक्ष महादेव सुळे भाजपमध्ये
मुंबई, २८जानेवारी २०२३ : नवी मुंबईतील काँग्रेस नेते महादेव आबा सुळे यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
श्री.सुळे हे काँग्रेसच्या प्रदेश शिक्षण सेलचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री.सुळे यांची प्रदेश भाजपाच्या शिक्षक सेल सहसंयोजकपदी नियुक्ती करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .