कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेतर्फे विशेष मुलांच्या शाळेत दिवाळी फराळ वाटप
उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था ही उरण तालुक्यातील नामांकित व अग्रेसर सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक बांधिलकी जपत कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सिबर्ड विशेष मुलांची शाळा बोरी नाका उरण मोरा रोड येथे दिवाळीनिमित्त मुलांना फराळ वाटप तसेच चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद शाळा पागोटे, कुंडेगाव, नवघर या शाळेतील सर्व मुलांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
फराळ व साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.यावेळी संस्थेचे संस्थापक कुणाल पाटील, सल्लागार महेश पाटील, अध्यक्ष सुमित पाटील, उपाध्यक्ष नकुल पाटील, सदस्य – प्रणय पाटील,ऋषिकेश म्हात्रे,विनय पाटील, अमित पाटील,हेमंत पाटील, आकाश म्हात्रे,रोशन म्हात्रे,ज्योतेश तांडेल, ऋतिक पाटील, साईराज पाटील,रितेश पाटील, अभिषेक केशवे,सेतराज साकेत, ऋषिकेश पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
फराळ वाटप साहित्य वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.