कॉम्रेड भूषण पाटील यांचे उपोषण स्थगित

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबईतील येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी २४ जून २०२५ रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेलं आमरण उपोषण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सरबत घेत स्थगित केले.
प्रकल्पग्रास्तांचे झुंझार लोकनेते दि.बा. पाटील यांचा १२ वा स्मृतिदिन मंगळवारी होता. याच दिवशी कॉम्रेड भूषण पाटील यांनी उपोषणाला सुवात केली होती. तसेच दुपारच्या दरम्यान उपोषण स्थळी जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, दि.बा.पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, दीपक म्हात्रे, जे. डी. तांडेल, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र म्हात्रे, सीमा घरत, नंदराज मुंगाजी, सुधाकर पाटील, नीलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!
यावेळी दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी नामकरणाबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशीच नामकरण होईल, असा विश्वास व्यक्त केला. नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. उपस्थित सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंतीनुसार, कॉम्रेड भूषण पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.