महाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हलसायन्स & टेक्नॉलॉजी

कोकणातून धावणारी ही गाडी झाली १५ ऐवजी २२ डब्यांची!

कोचुवेलीहून मडगाव-रत्नागिरी मार्गे जाते लो. टिळक टर्मिनसला

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीला एल एच बी लूक देण्यात आला आहे. याचबरोबर ही 15 डब्यांची असलेली ही गाडी आता सात डबे वाढवून 22 डब्यांची धावू लागली आहे

लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना सुरू झालेली आणि जुन्या रेकसह धावत असलेली गरीबरथ एक्सप्रेस (12202 / 12201)  ही आणखी एक गाडी दि. 23 जूनच्या फेरीपासून आत्याधुनिक एलएचबी रेकसह धावू लागली आहे.

भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचे जुने रेक बदलून त्याऐवजी नव्या श्रेणीतील एल एच बी रेकसह गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे. त्यानुसार नवीन गाड्यांच्या उपलब्धतेनुसार एल एच बी गाड्या चालवण्यात येत आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या देखील जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या एल एच बी रेकसह चालवल्या जात आहेत. आता त्यामध्ये केरळमधील कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसला (12202/12201) कोचुवेली येथून सुटणाऱ्या फेरीसाठी दि. 23 जून 2024पासून तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली मार्गावर धावताना दिनांक 24 जून 2024 च्या फेरीपासून एल एच बी  रेक उपलब्ध केला जाणार आहे.

पंधरा डब्यांची गरीबरथ एक्सप्रेस होणार २२ डब्यांची!

नव्या कोच रचनेनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी गरीबरथ एक्सप्रेस पूर्वीच्या पंधरा डब्यांच्या ऐवजी आता एलएचबी स्वरूपात धावू लागल्यानंतर 22 डब्यांची होणार आहे.

या स्थानकांवर थांबते गरीबरथ एक्सप्रेस

कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर ही गाडी उडपी, मुकाम्बिका रोड, अंकोला, कारवार, मडगाव, रत्नागिरी हे थांबे घेत पुढे पनवेल ठाणे या स्थानकांवर थांबे घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला तिचा प्रवास संपतो.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button