कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्तांच्या अभावी रुग्णांची होणारी हेळसांड थांबावी व गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, माजी विद्यार्थी संघ, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था उरण, टायगर ग्रुप उरण, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण, वुमन ऑफ विसङ्म शैक्षणिक व सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लबचे अध्यक्ष सदानंद गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणीज्य व कला महाविदयालय, तहसिल कार्यालया समोर उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या या रक्त्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.