कोकण रेल्वेकडून ‘महिला सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ विषयावर चर्चासत्र

- माजी पोलिस महासंचालक (निवृत्त) श्री डी. शिवनंदन यांचे मार्गदर्शन
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्फत १० जुलै २०२५ रोजी बेलापूर येथील त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (निवृत्त) श्री डी. शिवनंदन हे प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या सामाजिक आणि डिजिटल वातावरणात “महिला सुरक्षा” आणि “सायबर गुन्हे” या महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचा समारोप प्रश्नोत्तर संवादाने झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. दैनदिन जीवनात वावरताना महिलाना घ्यायची खबरदारी आणि सायबर कायद्यातील तरतुदी यांची माहिती या निमित्ताने देण्यात आली.