कोकण रेल्वे मार्गे उद्या धावणार पहिली महाकुंभ स्पेशल ट्रेन
रत्नागिरी : मडगाव ते प्रयागराज ही कोकण रेल्वे मार्र्गे धावणारी पहिली महाकुंभ विशेष गाडी 6 फेब्रुवारी रोजी सुटणार आहे. गोवा ते प्रयागराज आणि प्रयागराज ते मडगाव अशी गोव्यातून महाकुंभसाठी जाणार्या भाविकांसाठी विशेष गाडी आहे. मडगाव येथून सुटल्यानंतर भाविकांना घेण्यासाठी ही गाडी केवळ करमळी तसेच थीवी स्थानकावरच थांबणार आहे.
याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 00186/00185 ही गाडी मडगाव येथून दि. 6 फेबु्रवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि प्रयागराजला दि. 7 फेब्रुवारी सायंकाळी साडेसहा वाजता पोहचेल. कोकण रेल्वे मार्गारुन महाकुंभसाठी गेलेेली ही पहिली गाडी (00185) दि. 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि दि. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल.
गोव्यातून या गाडीच्या प्रयाराजसाठी एकूण तीन फेर्या होणार आहेत.
ही गाडी गोव्यातील तीन स्थानकांवर भाविकांना घेतल्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, नाशिक, जबलपूरमार्गेे उत्तरप्रदेशातील प्रयागराजला जाणार आहे. गोव्यातील मडगाव, करमळी तसेच थीवी याच स्थानकांवर भाविक या गाडीत चढू शकणार आहेत. त्यापुढे कुठेही ही गाडी भाविकांना घेण्यासाठी थांबा घेणार नाही.