कोमणादेवी ऑक्सिजन पार्कमधील दगड झाले बोलके!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरणमध्ये मोस्ट कार्ट कंपनीचे मालक सतीश गावंड यांच्या सहकार्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे निर्जीव दगडावर अनेक प्राणी, पक्षी विविध प्रकारचे निसर्ग संवर्धनाचे संदेश देऊन या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र साटम आणि त्यांचे सहकारी स्वाती मॅडम, गणेश, ओमकार यांच्या कलाकारीने हे दगड आज जिवंत झाले आहेत.
मोस्ट कार्टचे मालक सतीश गावंड यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अनेक निसर्ग प्रेमी आणि पक्षी प्राणी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहान मुलापासून ते वृद्धा पर्यंत सगळेच हे पहाण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अनेक शाळाच्या शैक्षणिक सहली ह्या ऑक्सिजन पार्क मध्ये येत आहेत.भविष्यात कोमनादेवी ऑक्सिजन पार्क हे एक सुदंर पर्यटन स्थळ व्हावा यासाठी हा प्रयत्न सारडे विकास मंचच्या सदस्या मार्फत केला जात आहे.भविष्यात कोमणादेवी ऑक्सिजन पार्क हे एक स्वप्नातील पार्क आसेल असे मत उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी व्यक्त केलं आहे.
या सहा दिवसाच्या कार्यात अनेक मान्यवरांनी निसर्ग प्रेमीनी कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिली. यामध्ये उरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू , विरेश मोडखरकर, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, विनायक गावंड, रोहित पाटील, त्रिजन पाटील, रामनाथ पाटील,हरीश म्हात्रे, गणेश भोईर, सागर पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, रामदास म्हात्रे, शिवकुमार म्हात्रे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन उरण प्रमुख रणीता ठाकुर, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश पाटील, लेखिका हेमाली म्हात्रे, स्नेहाताई पाटील, रुपाली म्हात्रे सानिका, गावंड, रिया म्हात्रे, चेतन गावंड,चंद्रशेखर जी भोमकर, युट्यूबर सतीश म्हात्रे,सागर पाटील, प्रेम म्हात्रे, हेमंत ठाकुर, संदेश पाटील, कल्पेश कोळी, अतिश डनगर,करण ठाकुर, सिध्दार्थ ठाकूर, राजेश म्हात्रे, पुष्पा म्हात्रे,रूद्र, स्नेहीत, निल, निरव, श्रिवेद, दानिश, राजेश सारा, विभा, पलक, रिया या सर्वांनी भेट देऊन या कार्याचे कौतुक केले. सर्वांनी खूप मेहनत घेउन पार्कच्या सौन्दर्यात भर घालण्याचे काम केले आहे.