कोळघर येथे ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : ओएनजीसी उरण संयंत्र ने अलिबागचा वन विभाग आणि एनजीओ शृंखला यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर २०२४ रोजी भारत सरकारच्या “एक पेड माँ के नाम” उपक्रमाचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील कोळघर येथे १० विविध देशी जातींचे सुमारे १०,००० सीडबॉल टाकण्यात आले.
ओएनजीसी टीमचे नेतृत्व GGM-हेड मेंटेनन्स आणि ऑफिशिएटिंग प्लांट मॅनेजर बिक्रम सिंग, CGM-मुख्य अभियांत्रिकी सेवा – वायव्हीटीआर शेखर, जीएम-हेड एचआर श्रीमती. भावना आठवले आदींनी केले.
स्थानिक आदिवासी महिलांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सीडबॉल तयार केले होते ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाहही झाला. जवळच्या आश्रमशाळेतील सुमारे ४०० हुन अधिक मुलांनी यात सहभाग घेतला.सीडबॉल कसे बनवायचे आणि वेळेची बचत, अत्यंत कमी खर्चात वनीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पारंपारिक वृक्षारोपण पद्धतीचे महत्त्व याविषयी एनजीओने आयोजित केलेले जागरूकता सत्राचा सर्वांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.