खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांचे रत्नागिरीत एप्रिलमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या एप्रिल महिन्यामध्ये रत्नागिरी येथे सपंन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारीा रत्नागिरी जिल्हा संघाने घेतलीे आहे.
यअनुषंगाने अधिवेशनाचे नियोजन करण्यासंदर्भात रत्नागिरी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच परशुरामपंत प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडली. यावेळी मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन, जबाबदाऱ्या, निधी संकलन इत्यादी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. अधिवेशन व्यवस्थित व उत्साहात पार पडण्यासाठी प्राथमिक टप्प्यातील काही गोष्टींबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या अधिवेशनाला राज्यस्तरावरील अनेक मान्यवर मंडळी, पदाधिकारी व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सभेमध्ये यावेळी जिल्हा अध्यक्ष दीपक घवाळी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद नारकर, जिल्हा सचिव सुनिल डांगे, सहसचिव हणमंत ऐवळे, मुख्याध्यापक प्रतिनिधी सौ. आसक्ती भोळे, प्रसिद्धी प्रमुख सौ. सायली राजवाडे, तालुका अध्यक्ष प्रकाश कदम, तालुका सचिव प्रवीण मोरे व अन्य शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.