खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५’ या किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय जासई उरण येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेलो इंडिया अस्मिता वूमेन्स लीग २०२५’ या किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये आर. के. जी. पब्लिक स्कुल जासईमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये समृद्धी शिंदे – गोल्ड मेडल, श्वेता सिंग – सिल्वर मेडल, श्रेया म्हात्रे – सिल्वर मेडल,ख़ुशी गौड – सिल्वर मेडल, हर्षिता यादव – सिल्वर मॅडल,दिया पाटील – ब्रॉन्झ मेडल,फातिमा शेख – ब्रॉन्झ मेडल तर पूर्वी भगत, समसारा शेख, तनिष्का देवरानी,तन्नू सरोज, क्रिशा भालेकर यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांना आर. के. जी. पब्लिक स्कुल जासईचे चेअरमन संतोष कृष्णाजी घरत, शाळेच्या प्राचार्य वैशाली नगराळे व शाळेच्या कर्मचारी श्रीमती सुरेखा पाटील यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले. तसेच किकबॉक्सिंग प्रशिक्षक संतोष मोकल , कु. शुभम म्हात्रे, कु. आकाश भिडे व कु. केवल मोकल यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच या स्पर्धेसाठी महाराष्ट्र किकबॉक्सिंग चे अध्यक्ष निलेश शेलार यांनी देखील हजेरी लावली होती. उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
या विद्यार्थ्यांना आर. के. जी. पब्लिक स्कुल जासईचे चेअरमन संतोष कृष्णाजी घरत, शाळेच्या प्राचार्य वैशाली नगराळे व शाळेच्या कर्मचारी श्रीमती सुरेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच किक बॉक्सिंग प्रशिक्षक संतोष मोकल, शुभम म्हात्रे, आकाश भिडे व केवल मोकल यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र किकबॉक्सिंग चे अध्यक्ष निलेश शेलार यांनी देखील हजेरी लावली होती. उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.




