खोपटा इसार जेटी येथे पारंपरिक मच्छीमारांची बैठक
उरण पूर्व विभाग मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षपदी कांचन कोळी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण,आवरे, गोवठणे, पाले, कोप्रोली, खोपटे, भेंडखळ, नवघर, कुंडेगाव, मोठी जुई, बोरखार, टाकीगाव,दिघोडे येथील पारंपरिक मच्छीमारांची बैठक बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता खोपटा इसार जेट्टी येथे संपन्न झाली.
यावेळी गुरुप्रसाद म्हात्रे (चेअरमन कडापे मच्छिमार सोसायटी ), श्रीराम पाटील (चेअरमन गोवठने मच्छिमार सोसायटी), यशवंत नाखवा (चेअरमन शितला देवी मच्छिमार सोसायटी), सामाजीक कायकर्ते रवि पाटील नवघर, नवघर कुंडेगाव ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी, सामाजिक कार्यकर्ते हसुराम घरत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कोळी, प्रधान कोळी, दिघोडे येथील सामाजिक कार्यकर्ते व बहुसंख्य मच्छिमार उपस्थित होते.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष कांचन कोळी, हसुराम घरत (सेक्रेटरी), उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे, खजिनदार गोकुळ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सर्वानुमते निवड झाल्याने या नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.