खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत ठाकूर काळाच्या पडद्याआड

उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे द.पी.पाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत धनाजी ठाकूर (६७) यांचे अल्पशा आजाराने नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने घरातील कर्ता हरपल्याचे दुःख कुटुंबियांवर निर्माण झाले आहे.
समाजाशी बांधिलकी असलेल्या या नेतृत्वाने पूर्वविभागासह संपूर्ण उरण तालुक्यात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमठविला आहे. मागील ७ वर्षांपूर्वी एन.ए.डी.करंजा येथील एम.एस.विभागात टेकनेशन्स पदावरून निवृत्त झालेले अनंत ठाकूर यांनी समाजात आपली अनोखी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुली,
जावई, भाऊ आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या खोपटे द.पी.पाडा.येथील निवासस्थानी व स्मशानभूमीत त्यांचे अंत्ययात्रेसाठी नातेवाईक,मित्रमंडळीसह तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती.