गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
५८ व्या वाढदिवसानिमित्त मधुकर पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, तालुका उरण जिल्हा रायगड .या शैक्षणिक संकुलात या विद्यालयाचे सल्लागार समितीचे सदस्य शिक्षणप्रेमी मधुकर पाटील यांनी आपला वाढदिवस गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.
मधुकर पाटील यांचा 58 वा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी ज्या शाळेत आपण शिक्षणाचे धडे घेतले त्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर,गणवेश ,कंपास पेटी,लेखन पॅड, तसेच बूट इत्यादी प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील हे लाभले होते
. त्यांनी मधुकर पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या
. तसेच शाळेचे चेअरमन अरुण जगे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.