क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय
गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी डीजिटल माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत अंमलबजावणीमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच राज्यात नवीन फौजदारी संहिता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय कामाचे रँकिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.