ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षपदी नियुक्ती
नागपूर : विधानसभेच्या कामकाजासाठी तालिका सभापती म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनाले, दिलीप सोपल यांच्यासह तसेच चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून गेलेले शेखर निकम यांची निवड झाली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका सभाध्यक्षपदी चार सदस्यांची निवड केली आहे. त्यामध्ये चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचा देखील समावेश आहे. शेखर निकम यांची तालिका सभापती म्हणून निवड झाल्याने त्यांचे चिपळूण संगमेश्वरमधून अभिनंदन केले जात आहे.