चिर्ले येथील महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ
उरण ( विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना आरोग्याच्या उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळावी, आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, आरोग्याकडे कोणत्याही व्यक्त्तीचे दुर्लक्ष होउ नये या अनुषंगाने शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत उरण तालुक्यातील चिर्ले गावातील जिल्हा परिषद शाळा येथे शिवसेना (बाळा साहेबांची शिवसेना) पक्षाचे उरण शहर वैदयकीय कक्ष प्रमुख्य चैतन्य गोवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील, रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांच्या हस्ते झाले. तद्नंतर श्रीगणेश, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रस्तावनेत सीमा पाटील यांनी गोरगरिबांना उत्तमोत्तम आरोग्याच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांचे सहकार्य या शिबीराला लाभले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नागरिकांना शिबीरात उत्तम सेवा मिळणार आहे. असे सांगून उपस्थित सर्वांचे सीमा पाटील यांनी आभार मानले.
व्यासपीठावर यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतूल भगत, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश पाटील, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, साई संस्थान वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,चिर्लेचे सरपंच सुधाकर पाटील, रायगड जिल्हा सचिव प्रवीण नावंदर , उपाध्यक्ष विवेक शिंदे, पनवेल तालुका अध्यक्ष-नितिन गावंड,पनवेल तालुका सेक्रेटरी-संजय धनासुरे, लिगल अडवायझर – प्रतिभा पाटील, संतोष गायकवाड , सुशील माळी, शशिकांत रासकर केमिस्ट पदाधिकारी, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, चिर्लेचे उपसरपंच राजन घरत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कार्यालयीन व्यवस्थापक स्वरूप काकडे, दिपाली चव्हाण, ऋषिकेश देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चैतन्य पाटील यांनी चांगल्या उपक्रमाचे आयोजन केले असून गोरगरिबांना आरोग्याच्या चांगल्या सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या व स्तुत्य असे उपक्रमाचे आयोजन केल्याने याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे आम्ही नेहमी चैतन्याच्या पाठीशी आहोत असे अतुल भगत यांनी आपल्या भाषणातून सांगितले.रविशेठ पाटील यांनीही आपल्या भाषणातून सदर उपक्रमाचे कौतूक केले.सरपंच सुधाकर पाटील यांनीही चैतन्याच्या कार्याचे कौतूक केले. शेवटी रुपेश पाटील यांनी चैतन्य पाटील आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करीत असून लवकरच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले.
दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री सहायता निधी तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सदर महाआरोग्य शिबीराला भेट दिली.त्यांनीही सदर महाआरोग्य शिबीराला जनतेचा मिळालेला उत्तम प्रतिसाद बघून चैतन्य पाटील यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराचे कौतूक केले.
या आरोग्य शिबीरात अपोलो हॉस्पीटल, मेडिकोअर हॉस्पीटल, स्मार्ट केअर डायग्नोस्टिक सेंटर च्या डॉ. दिपाली गोडघाटे, स्मार्ट पॅथ लॅब, सुश्रूषा हॉस्पीटल, अष्टविनायक हॉस्पीटल, डि. वाय. पाटील हॉस्पीटल, स्वस्तिक ब्लड सेंटर, केमिस्ट ब्लड सेंटर, जमनाबाई हॉस्पीटल, माने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, केमिस्ट असोसिएशन उलवेचे बालाजी मदनुरे, संतोष आणि प्रियांका पवार, आर आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पीटल, गेज आय केअर सेंटर, चिकित्सा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आदी उरण, पनवेल तालुक्यातील व नवी मुंबई मधील विविध नामवंत हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारि डॉक्टर नर्सने नागरिकांना मोफत विविध सेवा दिली.नेत्र तपासणी इसीजी, एनजीओग्राफी, एनजीओप्लास्टी, मूळव्याध हर्निया, अपेंडोकटॉमी, हायड्रॉसेल,मोतीबिंदू, टायमनोप्लास्टी, हिस्टेरेक्टॉमी, डोके कान नका घसा तसेच विविध आजारावर यावेळी मोफत सल्ला व या आजारांशी संबंधित मोफत तपासणी करण्यात आले.नागरिकांना मोफत गोळया औषधांचे वाटप करण्यात आले.विविध शस्त्रक्रियाही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शुगर,ब्लेड प्रेशर, वजन, उंचीही तपासणी करण्यात आली.नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले. कार्यक्रम यशस्वी केल्याने शेवटी चैतन्य पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. एकंदरीत उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.