चैतन्य पाटील यांनी वाचविले अपघातग्रस्त युवकाचे प्राण!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दि 16 मे 2023 रोजी पहाटे 2:30 वाजता शार्दूल शिवकर (शिवसेना वैद्यकीय कक्ष पूर्व विभाग प्रमुख ) यांचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उरण शहर कक्ष प्रमुख चैतन्य पाटील यांना फोन आला. उरण तालुक्यातील वेश्वी पेट्रोल पंप जवळ एक व्यक्ती अपघात होऊन खूप जखमी झाला आहे. रस्त्याच्या शेजारी पडला आहे. व फार गंभीर अवस्थेत आहे. आणि कोणी त्याच्या मदतीसाठी थांबायला तयार नाही, असे सांगताच चैतन्य पाटील यांनी त्वरित एम्बुलेंस साठी संपर्क केला. पण एम्बुलेंस पोहचण्यासाठी किमान 40 मिनिटे लागण्याची शक्यता होती व त्या व्यक्तिला वाचण्यासाठी वेळही फार कमी होता. अशा वेळी मागचा पुढचा विचार न करता चैतन्य पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त व्यक्तींच्या डोक्याला आणि हातपायला खूप मार लागला होता. रक्तबंबाळ झालं होता. अश्या वेळी चैतन्य पाटील यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या गाडीमध्ये बसवून एमजीएम रुग्णालयात पहाटे 3:15 वाजता घेऊन गेले.सोबत शार्दूल व त्याचा मित्र सहयोग कोळी सुद्धा होते.अपघातग्रस्त व्यक्तीवर लगेच त्वरित मोफत उपचार चालू केले. प्रसंगावधान दाखवून वेळेत केलेल्या मदतीमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
जखमीला वेळीच मदत करा केवळ फोटो व्हायरल करू नयेत
अपघातग्रस्त व्यक्ती परप्रांतीय असून पुढील महिन्यात त्याचे लग्न आहे, असे तो सांगत होता. त्यासाठी धावून गेल्याने खूप कळकळीने आभार व्यक्त करत होता. त्याच्या घरातले नातेवाईक रुग्णालयात गेल्यावर त्यांची व्यक्ती आता सुखरुप आहे, असे कळाल्यावर त्यांनी चैतन्य पाटील व शार्दूल शिवकर, सहयोग कोळी यांचे आभार व्यक्त केले. आपल्या परिसरात कधीही कुठेही अपघात झाला तर त्या व्यक्तीला त्वरित मदत करा. अपघात झाल्यावर किंवा एखाद्या व्यक्तीवर वाईट प्रसंग आल्यावर नुसते फोटो काढून वायरल करण्यापेक्षा, पळून न जाता मदत करा त्या रुग्णाला तुमची फार गरज असते. तुमच्या थोड्या वेळामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो असे चैतन्य पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
चैतन्य पाटील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने चैतन्य पाटील यांनी आजपर्यंत अनेक व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. अनेक व्यक्तींचा दवाखानाचे बिल माफ केले आहेत. तर अनेक रुग्णांना बिलात सवलत सुद्धा दिली आहे.अनेकांना मार्गदर्शन सुद्धा केले आहे. त्यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या फोर व्हिलर वाहणात घेउन दवाखान्यात ऍडमिट केल्याने व त्या व्यक्तीचा जीव वाचविल्याने चैतन्य पाटील यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही समस्या उदभवल्यास, किंवा कोणाला त्वरित मदत पाहिजे असल्यास चैतन्य गोवर्धन पाटील ( उरण शहर कक्ष प्रमुख शिवसेना वैदकीय मदत कक्ष)फोन नंबर – 8452821595, 9324021435 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.