उद्योग जगतमहाराष्ट्रराजकीय

जनेप प्राधिकरणाने भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून  स्थान मिळवले : ना. सर्बानंद सोनोवाल

  • स्थापनेच्या ३६ वर्षाचा उत्सव साजरा

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : भारताचे सर्वोत्तम कार्यप्रदर्शन करणारे बंदर म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) सोमवारी, २६ मे २०२५ रोजी आपला ३६ वा वर्धापन दिन साजरा करताना भारतातील कंटेनर बंदर क्षेत्रात आपले स्थान ‘भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर’ म्हणून नव्याने परिभाषित केले. या विशेष कार्यक्रमात भारत सरकारचे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यात ना. शांतनू ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग), टी. के. रामचंद्रन, भा.प्र.से., सचिव (बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय), श्री श्याम जग्गनाथन, भा. प्र. से., महासंचालक (शिपिंग), विमलकुमार श्रीवास्तव, भा.रा.से., मुख्य आयुक्त (कस्टम्स, मुंबई), विजयकुमार, भा.प्र.से., अध्यक्ष (आयडब्ल्यूएआय), शशिकिरण शेट्टी, अध्यक्ष (ऑलकार्गो ग्रुप), शध्रुव कोटक, व्यवस्थापकीय संचालक (जेएम बक्षी ग्रुप), विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व जनेप प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. 

समारंभाचा एक भाग म्हणून, उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले आणि गेल्या साडेतीन दशकांमध्ये झालेल्या जनेप प्राधिकरणाच्या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात ‘जनेप प्राधिकरण ३६ वर्षांचा प्रवास’ या कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले, ज्यात बंदराच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आणि यशाचा आलेख मांडण्यात आला. तसेच, जनेप प्राधिकरण कॉर्पोरेट फिल्मची खास स्क्रीनिंग करण्यात आली, ज्यामध्ये बंदराची पायाभूत सुविधा, नवोपक्रम, शाश्वतता विषयक प्रयत्न, आणि भविष्यकालीन दृष्टीकोन यांचा आढावा घेण्यात आला. 

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button