उद्योग जगतजगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव

  • जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ : उद्योग मंत्री उदय सामंत

बर्लीन : जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी एमआयडीसीमध्ये ५०० एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. त्याचबरोबर अनिवासी महाराष्ट्रीयन नागरिकांसाठीही (NRM) धोरणाअतंर्गत १०० एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत हे सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. जर्मनीतही मराठी माणूस महाराष्ट्राची संस्कृती घेऊन जगत असल्याबद्दल डॉ. सामंत यांनी समाधान व्यक्त केलं.

जर्मनीतून महाराष्ट्रात येणाऱ्या अशा प्रकल्पांचं महाराष्ट्रात मनापासून स्वागत केलं जाईल आणि त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सुविधा दिल्या जातील. तसेच जर्मनीतील मध्यम उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी जर्मनीतल्या मराठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी उद्योग मंत्र्यांनी केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button