महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्ससाहित्य-कला-संस्कृती
जाकादेवी येथे देवदिवाळीनिमित्त यात्रोत्सव
सुमारे २० हजारपेक्षा जास्त भाविकांनी घेतले जाकादेवी देवीचे दर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी येथे देव दिवाळीनिमित्त ३ दिवशीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि. २१ रोजी देव दिवाळी यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी या नवसाला पावणाऱ्या जाकादेवी देवस्थानचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले.
शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी नित्य पूजा करण्यात आली. सकाळी ७ वाजता देव दिवाळी यात्रोत्सवानिमित्य श्री.जाकादेवी देवस्थानच्या देवदर्शनासाठी रीघ लागली होती. भाविकांनी जाकादेवीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन प्रसन्न झाले. दुपारी १२.३० ते ३ वा. खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी -नित्य पूजा आरती, भोवत्या. रात्री १०.३० वाजता स्थानिक गोताडवाडी येथील नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शनिवारी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ( २२ नोव्हेंबर) रोजी सकाळी नित्य पूजा- आरती, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद होईल .दुपारी १ वाजता महिलांचे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी नित्य पूजा, रात्री ८.३० वाजता आरती भोवत्या ,रात्री १०.३० वाजता जाकादेवी पंचक्रोशी ओमकार ओमसाई थिएटर मुंबई यांच्यामार्फत आंधळा मागतो डोळा हा प्रसिद्ध विनोदी २ अंकी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.नवसाला पावणाऱ्या जाकादेवी देवस्थानच्या वार्षिक देव दिवाळी यात्रोत्सवाला रत्नागिरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी,जिल्हा परजिल्ह्यातीलही भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावल्याने खालगांव जाकादेवी देवस्थान कमिटीने समाधान व्यक्त केले.





