महाराष्ट्र
जागतिक पाणथळ दिवस व कांदळवन स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाचे कांदळवन विभाग- दक्षिण कोकण अलिबाग – रायगड, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र, वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे,उरण व माझी वसुंधरा अभियान ५.०, ग्रामपंचायत बोकडविरा, ग्रुप ग्रामपंचायत नवघर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिवस व कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
कांदळवन वन परिमंडळ अधिकारी किशोर सोनवणे व त्यांचा एमएसएफ स्टाफ,कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प सहयोगी साईश्वरी व विवेकजी हे तांत्रिक मार्गदर्शनासाठी तसेच निकेतन ठाकूर हे पर्यावरण प्रकल्प समन्वयक ग्रामपंचायत बोकडविरा व फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चे प्रभारी प्राचार्य डॉ आमोद ठक्कर, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख चव्हाण जी. डी. डॉ. घोडके राज्यशास्त्र विभाग प्रमुख, रसायनशास्त्र विभागाचे वाय ए गायकवाड व डॉ. सोनवले एम सी, एनएसएस चे डॉ धिंदले, सी डी विद्यार्थी ,एमएसएफ स्टाफ व उपस्थित सर्वांनी कांदळवन स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग घेतला.

ग्रुप ग्रामपंचायत नवघरचे सरपंच नितीन मढवी, उपसरपंच विश्वास तांडेल, कुंडेगावचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि बोकडविरा गावाचे उपसरपंच ध्रुव पाटील व सदस्य मिथुन पाटील यांची विशेष उपस्थिती होती. जमा झालेला कचरा घंटागाडी मार्फत गोळा केले गेला. अशा प्रकारचे स्वच्छता अभियान कांदळवन विभागाद्वारे पुढील काळात आयोजित केले जाणार आहेत. गावागावात फिरून कांदळवन क्षेत्रांवर कचऱ्याचा नायनाट करणे व कांदळवन परिसंस्थेस असणारा संभाव्य धोका कमी करणे हे ह्या अभियान मागचा उद्देश आहे असे उपस्थितांनी सांगितले.