जासई विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई ता. उरण जि. रायगड या विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध करण्यासाठी तसेच तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनाची तयारी करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे चे प्राचार्य तसेच रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे एम.के.यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटक आणि विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते उद्घाटन केले गेले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,भारतीय मजदुर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील हे या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या.हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास करून जासई गावातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली.या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयामार्फत स्वागत करून त्यांना खाऊवाटप केले गेले.तसेच या प्रदर्शनास रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक आणि स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य नुरा शेख, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य नरेश घरत तसेच जिल्हा स्काऊट-गाईड समन्वयक दाते इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या प्रदर्शन मांडणीमध्ये विज्ञान प्रदर्शन प्रमुख वाजेकर एम. एस,पाटील डी. जी. पाटील एस. सी., पाटील एन. पी. आणि सर्व विज्ञान शिक्षकांनी सहभाग घेतला होता.