जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : सालाबाद प्रमाणे या वर्षीही जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती रायगड, रथयत्रा समिती , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगडजवळील पाचाड येथील माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमीत्त पाचाड येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना विविध शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे या उपक्रमाचे १७ वे वर्ष होते.
या वेळेस उपस्थित – कोकण विभाग अध्यक्ष – शिवश्री सूर्यकांत भोसले , माजी. जिल्हा अध्यक्ष – शिवश्री स्वप्निल म्हात्रे, रायगड जिल्हा दक्षिण अध्यक्ष-शिवश्री भुषण सिसोदे , रायगड जिल्हा उत्तर अध्यक्ष – शिवश्री परमानंद जांभळे, रायगड जिल्हा महासचिव – शिवश्री समीर म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष – शिवश्री जितेश पाटिल , उरण तालुका उपाध्यक्ष – शिवश्री चंदन कडू, शिवश्री धमेंद्र पाटील, शिवश्री भावेश शेळके, तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या अलिबाग तालुका अध्यक्षा प्राची भगत, खजिनदार- सायली राऊल, सल्लागार प्रतिभा सावंत , सहसल्लागार- अंजली गुरव सचिव सविता चव्हाण, उपाध्यक्षा – कोमल नाईक, कोल्हाड विभाग अध्यक्षा सुनिता केणी व इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.