महाराष्ट्र

जिजाऊ ब्रिगेड महिलांनी दिली श्री समर्थ कृपा वृध्दधाम आश्रमाला भेट

उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : भारतातील महत्त्वाची संघटना म्हणून सुपरिचित असलेले,फुले, शाहु, आंबेडकर विचार धारेवर चालणारी जगभरात कार्यरत असणारी संघटना म्हणजे जिजाऊ ब्रिग्रेड. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा सिमाताई बोके यांच्या आदेशा नुसार व रायगड जिल्ह्या-अध्यक्षा रेवतीताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अलिबाग महिलांच्या वतीने श्री समर्थ कृपा वृध्दधाम परहुर पाडा अलिबाग या आश्रमाला व तेथील वृद्धांना फ्रूट व वस्तू वाटप करण्याचा उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात आला.
अँड. जयेंद्र गुंजाळ यांनी  मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्या प्राची भगत – तालुका अध्यक्षा ,कोमल नाईक – उपाध्यक्षा, कल्पना चव्हाण – सचिव,सायली राउळ – खजिनदार,प्रतिमा सावंत – सल्लागार, अंजली गुरव- सल्लागार, सवीता पाटील, प्रियंका सावंत, सुरेखा जाधव,वृषाली जांभळे व इत्यादी शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button