जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुका संघाची दमदार कामगिरी

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने १९ वी जिल्हास्तरीय खुली तायक्वॉंदो स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मारुती मंदिर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेत लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो अँड फिटनेस ॲकॅडमी लांजा अकॅडमीतील खेळाडूंनी पदके संपादन केली आहेत.
सुवर्णपदक -स्वर्णिम श्रेयश शेट्ये , तेजस्वी दशरथ लाड, भक्ती भागवत कुंभार.
रौप्य पदक-अन्वी सचिन पवार ,आराध्य कमलाकर सावंत, कास्यपदक प्रिया प्रमोद लांजेकर, राजवर्धन रणजीत माने, आर्या कृष्णा आग्रे, आदिश्री अभय शेट्ये, योगेश ईश्वर तोंडारे यांना मिळाले.
तसेच सहभागी खेळाडूंमध्ये आर्या ओंकार देसाई, विघ्नेश विनोद दिवाळे, तनया संदीप पाटकर, वैष्णवी विजय मंचेकर, निधी रवींद्र लिंगायत, वृत्ती रंजन पावसकर, आराध्या कृष्णा आग्रे, आर्या सचिन पवार, रोहन चंद्रकांत साबळे आदी रंजन पावसकर, प्रशांतसिंग विजयसिंग चव्हाण, सागर संतोष चौगुले यांचा समावेश होता.
या स्पर्धा करता राष्ट्रीय पंच तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले तसेच या सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, शितल विरेंद्र आचरेकर, गणेश ईश्वर तोंडारे, त्यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक यांचे तायक्वांदो फिटनेस अकॅडमी लांजा चे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवलकर व समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.





