ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : भारत देशाचे नेते, मा.कृषीमंत्री ,फुले शाहु आंबेडकर यांचा वारसा जपनारे व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या त्यांना मंगलमय शुभैच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष ) तर्फे उलवे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानीम्मित निल सागर अपार्टमेंट ,प्लाॕट नंबर २०६, सेक्टर ८ उलवे नोड (नवी मुंबई) या ठिकाणी रुद्राक्षी क्लिनिक व पंचकर्म सेंटर आणि तेरणा हॉस्पिटल नेरुळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला व खुप चांगल्या टेस्ट घेवुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य करण्यात आले.
या कार्यक्रमास या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक संतोषभाई घरत ( प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ),डॉ.शालिनीताई वारद ( NCP डॉ. सेल सरचिटणीस नवी मुंबई ) त्याचप्रमाणे डॉ. प्रकाश नेवाळ, रायगड जिल्हा सरचिटणीस करण भोईर ,उलवे नोड संयोजक ॲड. राज पाटील इत्यादी पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.एकंदरीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.