महाराष्ट्र
‘डीआयओ’कडून अलिबाग प्रेस असोसिएशनला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची प्रतिमा भेट
अलिबाग : रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी अलिबाग प्रेस असोसिएशनला मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.
या प्रतिमेचे अनावरण मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात करताना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार ॲड.वैभव भोळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर रायगड टाईम्स चे संपादक राजन वेलकर, लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर, लोकमत चे राजेश भोस्तेकर, रत्नाकर पाटील, प्रणय पाटील हे उपस्थित होते.