डॉक्टरांच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी!
दापोली : रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या, वेळप्रसंगी आपल्या जीवाची, परिवाराची तमा न बाळगता रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या, अखंड देशसेवच व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर बंधू आणि भगिनी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ९ जुलै २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरीदरम्यान मार्गावरील काही दवाखाने आणि डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यात आले, त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, उपजिल्हा रुग्णालय, बाजारपेठ, बुरोंडी नाका, नवभारत छात्रालय, नर्सरी रोड, वडाचा कोंड, लालबाग, उदयनगर, आझाद मैदान असा ६ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील अनेक नागरिक आणि डॉक्टर सायकल चालवत सहभागी झाले होते. डॉ अजय क्षीरसागर, डॉ स्वप्निल देशमुख, डॉ प्रणय कासारे, डॉ महेश भागवत, डॉ प्रदीप बनसोडे उपजिल्हा रुग्णालय, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर जाधव, डॉ मुनीर सरगुरो, डॉ कुणाल मेहता, डॉ शेखर तलाठी, डॉ अनिरुद्ध फडके, डॉ शुभांगी फाटक, डॉ मानसी फाटक, डॉ शिरीषकुमार फाटक, डॉ राजेश तलाठी, डॉ गगन पाटील, डॉ गौतम दिवाण, डॉ विद्या दिवाण, डॉ अपर्णा मंडलिक, डॉ वैष्णवी भावे, डॉ ऋतुजा कदम, डॉ दिपक गरंडे, डॉ अमृता अनिल होन, डॉ अमित क्षिरसागर इत्यादी काही डॉक्टर, हॉस्पिटल सहकारी यांना भेटून त्यांचे आभार मानण्यात आले. सायकल फेरी झाल्यावर सायकल दुरुस्ती, पावसाळ्यात सायकल चालवताना घ्यावयाची काळजी इत्यादीबद्दल माहितीपूर्ण सेशन झाले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात अमोद बुटाला, राहुल मंडलिक, केतन पालवणकर, सर्वेश बागकर, सत्यवान दळवी, पराग केळस्कर, यश शिर्के इत्यादींचे सहकार्य लाभले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवूया असे आवाहन आयोजकांनी केले आहे.