डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोमवारी कल्याण येथे करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ही भव्यदिव्य वास्तू तसेच स्मारक उभारण्यात आले आहे.
लोकशाहीचा पाया रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला, आणि त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्याचा मला विशेष अभिमान आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू.
-डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या ज्ञान केंद्रामधून होणार असून, सामाजिक परिवर्तनासाठी हे केंद्र एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या या बहुमूल्य कार्याबद्दल त्यांचे विशेष आभार या कार्यक्रमात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मानले.